बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर त्यांच्या विरूद्ध भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. पण आता भाजपमधील एक नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यानं पंढरपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजप नेते कल्याण काळे हे येत्या 8 एप्रिलला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांची पोटनिवडणुक तोंडावर असताना कल्याण काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आपण यापुढे शरद पवार सांगतील त्याप्रमाणे काम करू, असं कल्याण काळे यांनी काही दिवसांपुर्वी म्हटलं होतं. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा चालू होती. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी शरद पवारांची इच्छा आहे. आमच्या चुका झाल्या तरी, त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही, असं देखील कल्याण काळे यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, कल्याण काळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. वसंततराव काळे साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. तर सिताराम महाराज साखर कारखान्याचे ते संस्थापक आहेत. पंढरपुराच्या राजकारणात साखर कारखान्याला मोठं महत्व आहे. त्यामुळेच कल्याण काळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

पंजाने धनुष्यबाणाशी जुळवून घेतलं, घड्याळाचं टायमिंग चुकलं, कमळाचं गणित हुकलं!

‘…म्हणून आम्ही सर्वांना कोरोना लस देत नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं कारण

‘…अन्यथा उद्रेक होईल’; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

गृहमंत्रिपदी विराजमान होताच दिलीप वळसे पाटलांचा पोलीस अधिकाऱ्यांना इशारा

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More