बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यसभा निवडणुकीत संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली”

मुंबई | राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे नेते तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांचा अनपेक्षित पराभव झाला आहे. संजय पवार यांच्या पराभवानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ऐनवेळी आमदारांनी दगाबाजी केल्याचा आरोप केला होता. तसेच दगाबाजी करणाऱ्यांची लिस्ट आमच्याकडे आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवून धमकी दिली, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये संजय राऊतांनी आमदारांना धमकावल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

शिवसेनेने आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठा दबाव आणला होता. संजय राऊत यांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली, अशा आशयाची तक्रार किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोागाकडे केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने आमदारांवर दबाव आणला, असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. मी दिल्लीला जाणार असून संजय राऊतांना धमक्या देणाऱ्या आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची विनंती करणार असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं.

दरम्यान, संजय राऊत यांनी काही आमदारांचा उल्लेख करत आपला विश्वासघात केला, दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेला मतं दिली नाहीत, असा आरोप केला होता. त्यावरून राज्यसभेची निवडणूक शिवसेनेने भ्रष्ट केली आहे. हे कायद्याच्या विरोधात असल्यामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“राखी सावंतने माझा फायदा घेतला, तिने माझं शोषण केलं”

“राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होईल”

ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर म्हणाले…

“अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात”

Siddhant Kapoor | मोठी बातमी! अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ ड्रग्ज घेताना सापडला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More