“उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका म्हणजे एटीएम, नोटा छापण्याची एक मशीन”
मुंबई | शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर आयकर विभागाने (Income Tax Department) टाच आणली. आयकर विभागाच्या कारवाईनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे.
यशवंत झाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या. यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे एटीएम आहे, असा घणाघात किरीट सोमय्यांनी केला आहे. खरं म्हणजे एटीएम म्हणजे तुमच्या आमच्यासाठी. त्यांच्यासाठी तर ही रिझर्व बँक, नोटा छापण्याची एक मशीन, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.
दरम्यान, प्राप्तिकर विभागाने जाधवांवर केलेल्या कारवाईचं सोमय्यांनी ट्विट करत कौतुक केलं आहे. तर घोटाळेबाज यशवंत जाधव यांच्यावर ईडी आणि कंपनी मंत्रालयही कारवाई करेल याची खात्री असल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत.
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाकडून आज मुंबई येथे बेनामी मालमत्तांच्या जप्त करण्याचा कारवाईचे मी स्वागत करतो.
घोटाळेबाज यशवंत जाधव यांच्यावर ईडी आणि कंपनी मंत्रालयही कठोर कारवाई करेल याची मला खात्री आहे.@BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 8, 2022
थोडक्यात बातम्या-
मनसेवर नाराज वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंची खास ऑफर
छगन भुजबळांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण, म्हणाले…
कोरोना निर्बंध हटवल्यानंतर राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मोठी बातमी! शिवसेना नेते यशवंत जाधव यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त
“संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाही तर शरद पवारांचे समर्थक”
Comments are closed.