Top News महाराष्ट्र मुंबई

‘ठाकरे सरकार आणि बीएमसीनं केला 900 कोटींचा जमीन घोटाळा’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई | ठाकरे सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं दहिसरमध्ये 900 कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी सत्तेत आल्यावर पहिला निर्णय घेतला तो म्हणजे दहिसर येथील 900 कोटींची जमीन एका बिल्डरला बहाल केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

2 नोव्हेंबला महापालिकेच्या सुधार समितीने या भूखंडाच्या ताब्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्यावेळचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तो फेटाळला.  29 नोव्हेंबर रोजी सुधार समितीची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक होणार होती. या बैठकीत दहिसर एकसर येथील भूखंडाच्या खरेदीचा विषय  तातडीचा विषय म्हणून कार्यक्रमपत्रिकेत घुसडवण्यात आल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला असताना आणखी एक आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीवर शरद पवार म्हणाले…

“शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका मांडावी, मग आम्ही…”

“पप्पाच्या पप्पूने मुलीला त्रास देण्यासाठी जनतेचे 82 लाख उडवले”

आम्ही या गोष्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही- राहुल गांधी

…तर लोक मोदींना हाकलून लावतील- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या