बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेते किरीट सोमय्या स्थानबद्ध???; देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने खळबळ

मुंबई | भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या चर्चेत आहेत. किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांचा धडाका लावला होता. त्यातच आता किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध केल्याची माहिती समोर आली आहे.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारची दडपशाही सुरू आहे. माझा घराखाली पोलिसांची गर्दी आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्री आदेश असल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

दरम्यान, मी मुलुंड येथील निलमनगरहून साडेपाच वाजता निघणार आहे. आदी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून 7:15 वाजता सीएसटी स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेसकडे रवाना होईल, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘डाॅल्फिनने माझ्यासोबत सेक्स केला अन् …’, महिलेने केला अजब खुलासा

…म्हणून अंबिका सोनींनी नाकारली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर

नदीच्या प्रवाहात अडकला मुलगा, तरूणीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ चुका टाळव्यात, अन्यथा गमवाल आपले प्राण!!

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणंच बाकी ठेवलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More