Top News महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनेचा भगवा फडकेल पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील”

मुंबई | महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिला असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा जरुर फडकेल. पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी बिग बॉसमधील घडलेल्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. माझी पत्नी आणि सून मराठीच आहेत. अशा पद्धतीने मराठी भाषेचा अपमान करणं चूक असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील, या टीकेवर आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

‘ठाकरे सरकार आणि बीएमसीनं केला 900 कोटींचा जमीन घोटाळा’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीवर शरद पवार म्हणाले…

“शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका मांडावी, मग आम्ही…”

“पप्पाच्या पप्पूने मुलीला त्रास देण्यासाठी जनतेचे 82 लाख उडवले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या