बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे’; ‘त्या’ प्रकरणावरून भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई | मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यामध्ये झालेल्या जमीन-खरेदीच्या व्यवहारावरून भाजपने केलेल्या आरोपांना नाईक कुटुंबियांनी उत्तर दिली. यावेळी त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत.

नाईक कुटुंबीय जमिनीची खरेदी-विक्री हा आमचा व्यवसाय असल्याचा दावा करत आहेत. ही गोष्ट चांगली आहे पण ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे याविषयी कोणीही बोलत नसल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यासोबतच नाईक परिवाराला पुढे करून ते पैशांची अफरातफर करत असतील तर मला बोलावेच लागेल. ज्याने कोणी चोरीचा पैसा घेतला आहे तो परत द्यावाच लागेल. उद्धव ठाकरे यांची गाठ किरीट सोमय्याशी आहे, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

याआधी अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर टीका केली होती. माझे वडील हे वास्तूविशारद होते त्यांनी अनेक नेत्यांना जमिनी विकल्या असतील. अगदी शेवटपर्यंत ते प्लॉटिंग करुन जमिनी विकायचं काम करत होते. यामध्ये गैर ते काय आहे?, आणि भाजप नेत्यांकडून आरोप होत असलेल्या सातबाऱ्यांची माहिती द्यायला आम्ही तयार असल्याचं अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणामध्ये आमची दोन माणसं गेली आहेत म्हणून आमचा जीव खाली वर होतो. तर अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे ते आमच्यावर आरोप करतात मात्र किरीट सोमय्या यांचा जीव खालीवर कशामुळे होतो हे आम्हाला समजत नसल्याचं आज्ञा नाईक म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! राज्यात नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय उभारा- इम्तियाज जलील

सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

‘ही तर लोकशाहीची चेष्टा’; सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला फटकारलं

हवेत उडणारे सोनेरी कासव पाहून लोकं झाले चकित, पाहा व्हीडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More