बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नवाब मलिकांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार, त्यांच्या सांगण्यावरूनच…”

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून कथित कार्डेलिया ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर विविध आरोप केले आहेत. मोहित कंबोज यांचे मेव्हणे त्या रात्री उपस्थित असल्याचा मलिक यांनी आरोप केला होता. त्यानंतर आता प्रभाकर साईल याने हे सर्व प्रकरण 25 कोटींच्या वसूलीसाठी करत असल्याचा गंभीर आरोप एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि एनसीबीवर केला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर मंगळवारी आरोप केले आहेत. प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर आरोप हे नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून केले आहेत, असं मोहित कंबोज यांनी सांगितलं आहे. मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. शेअर करताना त्यांनी कॅपश्न्समध्ये लिहिताना नोटरी राम जी गुप्ता स्टिंग ऑपरेशन्स असं लिहीलं आहे.

तसेच रामजी म्हणतात प्रभाकर साईलने हे सर्व किरण गोसावीकडून पैशासाठी केलं आहे. या प्रकरणामागे मिया नवाब आणि मनोज असल्याचं स्पष्ट सांगत आहे. पुढं मोहित कंबोज म्हणाले, की मी एका काळ्या टी-शर्टचा उल्लेख केला होता. त्याचं नाव कुणाल जैन आहे. ज्याचे की बॉलिवूडमधील अभिनेत्यांशी आणि अनेक मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. याबाबत मी लवकरच खुलासा करणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रभाकर साईलने गोसावी यांच्याकडे पैसे मागितले होते. त्यांनी ते पैसे दिले नाहीत. त्यामुळे तेव्हा मलिक यांच्या सांगण्यावरून प्रभाकर साईल आरोप करत आहे. मी नवाब मलिक यांच्या विरूद्ध न्यायालयामध्ये जाणार आहे. तसेच त्यांच्याविरूद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; केली ‘ही’ मोठी घोषणा

“ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?”

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More