महाराष्ट्र मुंबई

‘भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर’; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Loading...

मुंबई | मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती समोर आली होती. विधान परिषदेची निवडणूक पुढे गेल्यानं त्यांना राज्यापालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी उद्धव ठाकरे हे स्वतःसाठी नशीबवान आहेत. त्यांना सर्वकाही घरबसल्या मिळालं आहे. आता आमदारकीही बसल्या राज्यपालांनी दिली, असं निलेश राणे म्हणाले.

मुख्यमंत्रीपद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालं, आमदारकी राज्यपालांकडून, पक्ष वडिलांचा, यांचं स्वत:चं असं काहीच नाही, अशी टीकाही निलेश राणेंनी केली आहे.

दरम्यान, विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाचं सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली जाणार आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

गुटखा खाऊन पचापचा थुंकणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला पोलिसांनी चोप चोप चोपला

मुंबईत वाढता कोरोनाबाधितांचा आकडा; महापालिका दक्षिण कोरियाकडून विकत घेणार 1 लाख किट्स

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा अन्…- शोएब अख्तर

‘रामायण’ मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे श्याम सुंदर काळाच्या पडद्याआड

शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का?- देवेंद्र फडणवीस

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या