बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला”

मुंबई | मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलं आहे. त्याचबरोबर ‘मराठा आरक्षण कायदा’ रद्द करण्याचा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 50%च्यावर आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक स्थिती नाही, असं म्हणतं मराठा आरक्षणाला अखेर रद्दबातल करण्यात आलं आहे. याच मराठा आरक्षणावरून आता राजकारणाला उधाण आलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे.

“या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला आहे. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे. राज्य सरकारची कसली तयारी नाही. फक्त नाटक आणि ढोंगीपणा चालू आहे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवलं आहे, तोंड वाजवून न्याय भेटत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा!”, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारचा मी निषेध करतो. मराठा आरक्षणाचं काय करावं यासाठी राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षण आजचा निकाल म्हणजे राज्य सरकारचं अपयश आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पंढरपुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने केली आहेत. तर मराठा आरक्षण रद्द निकालाबाबत पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडुन काळ्या फिती लाऊन सरकारच्या निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

भारतीय संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला – ॲड. गुणरत्न सदावर्ते

चिंता वाढली! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

उर्वरित आयपीएल ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता; ब्रिजेश पटेल यांचं सुचक वक्तव्य

“हम लाॅकडाऊन का पालन करेंगे” सकाळी व्यायामासाठी निघालेल्या लोकांचा पोलिसांनी काढला घाम

मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस – संभाजीराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More