बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वडील पट्टा लावून आडवे झालेत मुलगा परदेशात सेट झालाय”

मुंबई | महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करणारे भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ट्विट करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावरून महाविकास आघाडीसह मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट द्वारे आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांना उद्देशुन म्हटलं आहे, “वडील पट्टा लावून आडवे झालेत मुलगा परदेशात सेट झाला आहे,” अशी टिका करून त्यांनी वरूण सरदेसाईंवर निशाणा साधला आहे “त्या वरूण सरदेसाईला भांडी घासायला नेला आहे का? त्याचं काय काम?”असा प्रश्न त्यांनी ट्विमध्ये विचारला आहे.

याशिवाय त्यांनी पुढे ट्विटमध्ये मोदींचे उदाहरण देत आदित्य ठाकरेंना सुनावलं आहे, “मोदी पंतप्रधान असून 2 ते 3 दिवसात शासकीय दौरे आटपतात पण महाराष्ट्र कर्जबाजारी असून पण यांचे दौरे संपत नाहीत. जनतेचा पैसा आहे तो ठाकरे किंवा पवार कुटूंबाचा नाही,” असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.

मागील काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्कॉटलॅंड दौऱ्यावर आहेत. ते सीओपी 26 कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी त्याठिकाणी गेले आहेत. या कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला इन्स्पायरींग रिजनल लीडरशीप या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याच दौऱ्यावरून निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“निवडणुका जवळ आल्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला”

“बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”

हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या; कस्टम विभागाकडून मोठी कारवाई

ॲमेझॉनवरून चक्क करण्यात येत होती गांजा तस्करी, असा झाला पर्दाफाश

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 9 महिन्यानंतर मोठी घट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More