बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा”

मुंबई | सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. या प्रकरणामुळे राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांंगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

अधिकाऱ्यांची बदली केल्यामुळे पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी नाराज झाल्याची माहिती समजत आहे. यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहरक्षक दलाचे माजी प्रमुख संजय पांडे यांचा समावेश असल्याची माहिती आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे.

कशाचाच कोणाला पत्ता नाही, कोणाचा कोणावर अंकुश नाही असं हे भिकार ठाकरे सरकार. मुख्यमंत्र्याना मेसेज टाकून अधिकारी सुट्टीवर जायला लागले म्हणजे मुख्यमंत्र्याची काय किंमत आहे हे यावरून दिसते. मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, या बदलीमुळे हे दोन्ही अधिकारी नाराज असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरून नाराजी व्यक्त करणारा संदेशही पाठवला आहे. त्यानंतर संजय पांडेही तातडीच्या सुट्टीवर गेल्याची माहिती समजत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?, सोनू सूद म्हणाला…

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मंत्रिपद धोक्यात

‘राज्यात भाजपचं सरकार आल्यावर….’; नरेंद्र मोदींनी बंगालच्या जनतेला दिला शब्द

भारीच की! बीएम डब्लूची इलेक्ट्राॅनिक कार लवकरच लाँच, एकदाच करा चार्ज अन्….

राखी सावंतचा फॅन्स सोबतचा क्वालेटी टाईम पाहून तुमचं देखील होईल मनोरंजन, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More