बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांमुळे, अजित पवारांना राजकारणात संधी मिळाली मात्र त्यांनी घाण केली”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. अलिकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंचं तापलेलं दिसत आहे. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

चंद्रकांत पाटील अजित पवारांवर बोलल्यामुळे राष्ट्रवादीवाले विस्कटले आहेत. अजित पवार मोठा नेता नाही. त्यांना मोठा नेता मानन्याचं कारण देखील नाही. त्याचबरोबर त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे. परंतु त्यांनी घाण केली आहे. त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे गृहमंत्रिपद देऊ नये, असा सल्ला मी उद्धव ठाकरे यांना दिला होता, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला होता. देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात. तसेच राज्यात काय काय चालंलय हे उद्धव ठाकरे यांना माहित नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका-टिप्पणी होत आहेे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More