बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कॅरम खेळण्यापुरते सुद्धा आमदार उद्धव ठाकरेंकडे शिल्लक राहणार नाहीत”

मुंबई | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर त्यांच्या सोबत जाणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेची सुरु असलेली ही अवस्था नक्कीच धक्कादायक आहे. महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता आहे, मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की उद्धव ठाकरेंवर ओढवली आहे, त्यातच आता त्यांच्या जुन्या राजकीय शत्रूंनी त्यांच्या जखमांवर मीठ चोळायला सुरुवात केली आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले आणि भाजपमध्ये सध्या केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा शिवसेनेसोबतचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी आता या संधीचा चांगलाच फायदा घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरु केली आहे. “काल मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांना जायचे त्यांनी जा पटकण, अजून 6 आमदार निघून गेले. कॅरम खेळण्यापुरते पण शिल्लक रहाणार नाहीत असं दिसतंय, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं.

दरम्यान, बुधवारी देखील त्यांनी एक खोचक ट्वि़ट केलं होतं. “शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेनेसोबत रहातील अशी परिस्थिती आहे. पक्ष चालवणे उद्धव ठाकरेंचे काम नाही. हे 11/12 घेऊन IPL टीमसाठी तयारी करा. मातोश्री 11 बनवा.’, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, गुवाहाटीमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे, तसेच त्यांनी शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण मिळवण्याची देखील तयारी सुरु केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

 

थोडक्यात बातम्या –

“उद्धव ठाकरे यांनी आम्हाला रामलल्लाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखलं”

‘मला उमेदवारी दिली असती तर..’; छत्रपती संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

खळबळजनक: उद्धव ठाकरेंना भेटण्यास शिवसेना आमदारांना सहन करावा लागायचा असा प्रकार!

प्रति, उद्धव ठाकरे, पत्रास कारण की… संजय शिरसाट यांचं स्फोटक पत्र

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More