बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…यासाठी सत्ताधारी सेनेला किती दंड आकारायचा?”

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा पुरवाठा कमी पडल्याने अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात यावा, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली होती. मात्र, काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लॅंट उभारण्यास सुरूवात झाली आहे, तर बऱ्याच ठिकाणी हे प्लॅंट उभारण्यात अडचणी येत आहेत. आता याच मुद्द्यावरून भाजपचे नेते नितेश राणे यानी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करून करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, कोरोनामुळे मुंबईकर त्रस्त तर दुसरीकडे मनपाची वसुली गँग मस्त, असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढे त्यांनी कोरोना काळात क्लिनअप मार्शल्सकडून वसुल करण्यात आलेल्या दंडावरून सरकारचे वाभाडे काढले आहेत.

क्लिनअप मार्शल्सद्वारे महापालिकेने वसूल केलेल्या दंडाबद्दल ते म्हणाले, जनतेला दंडीत करून वसूल केलेले 78 कोटी पण ऑक्सिजनसाठीचा प्रकल्प कागदावरच खिळवला. पुढे ते म्हणतात, सरकारने हजारो मुंबईकरांचे प्राण घेतले. या सत्ताधारी सेेनेला किती दंड आकारायचा?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, खासगी रुग्णालयांना जागेची अडचण, रुग्णालयात घालण्यात आलेले वेगवेगळ्या प्रकराचे निर्बंध, प्रकल्प उभारण्यासाठीचा अतिरिक्त खर्च अशा अडचणी खासगी रुग्णालयांसमोर आहेत. त्यामुळे या खासगी रुग्णालयांना ऑक्सीजन प्रकल्प उभारण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तिसरी लाट आल्यास पुन्हा एकदा ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकतो.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More