दीपिका-भन्साळींचं शीर कापा, 10 कोटी मिळवा; भाजप नेत्याची घोषणा

चंदीगड | अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांचं शीर कापणाऱ्यास 10 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आलीय. हरियाणातील भाजप नेत्याने ही धक्कादायक घोषणा केलीय.

सूरजपाल अम्मू असं या नेत्याचं नाव असून ते भाजपचे माध्यम समन्वयक आहेत. त्यांनी रणबीर सिंहचे हात-पाय तोडण्याचीही धमकी दिलीय. 

‘पद्मावती’ सिनेमावरुन सुरु असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर या धमक्या दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच करनी सेनेनंही अशाच प्रकारची धमकी दिली होती.