मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने सामन्याच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधण्यात आला.
दरम्यान सामन्यातील अग्रलेखातून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केलंय.
अतुल भातखळकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि कधी कुठे भूकंप येईल याची काय शाश्वती?”
तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी, कोरोना काळातही वयाची पर्वा न करता, आपल्या सहयोगी पक्षातील काही नेत्यांना लाजवतील असे दौरे आपण केले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढलाय.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…
ग्रामपंचायत निवडणुका घोषित; 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी ‘या’ तारखेला होणार मतदान
“महिला स्वतःच्या मर्जीने प्रेमसंबंध बनवून त्यानंतर बलात्काराचा आरोप करतात”
पंकजा मुंडेंनी घटवलं तब्बल 14 किलो वजन; पाहा कसं आहे डेली रुटीन!
‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत