Top News पुणे महाराष्ट्र

‘पराभव साजरा करायलाही नशीब लागतं’; धनुभाऊंना पंकजाताईंकडून प्रत्युत्तर!

पुणे | ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांची शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली.  पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.

काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी जिल्ह्यात येतात, असं धनंजय मुंडे म्हणाले होते. यावर इतके दिवस मी घरात राहिले तर घरात का बसलात, असा प्रश्न विचारला जायचा आणि आता बाहेर पडले तर पराभव साजरा करायला बाहेर आल्या, पराभव साजरा करायलाही नशीब लागतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला, पराभव साजरा करण्यात काय गैर आहे?, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, जनतेच्या प्रश्नावर एकत्र असण्यात काही वावगं नाही. मात्र, याचा अर्थ मागचं सगळं मिटलं असाही नाही, हे सांगायला पंकजा मुंडे विसरल्या नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मिरमध्ये जमीन खरेदी करता येणार मात्र अद्यापही ‘या’ जमिनी खरेदी करता येणार नाहीत!

दसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं- चंद्रकांत पाटील

“सरकारने न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली, आज आमची मागणीही मान्य झाली”

‘पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही’; शिवसेनेचं पुन्हा राणेंवर टीकास्त्र

“मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली याला सरकार जबाबदार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या