मुंबई | आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. यांसंदर्भात त्यांनी ट्विट करत मोदी सरकारला आठवण करून दिली आहे.
आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, एकीकडे मराठा समाज आक्रमक झाला असताना आता ओबीसा समाजानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
हम भी इस देश के है हमारी भी गिनती करो .. ओबीसी जनगणना की आवश्यकता और अपरिहार्यता है ..कुछ यादे और कुछ वादे https://t.co/2yQi1fBgw0
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 24, 2021
थोडक्यात बातम्या-
सासरवाडीला बोलावत 25 वर्षांच्या जावयाची हत्या
धक्कादायक! शेतमजुरानं केला 2 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
“गळाभेट घेऊन रामाचं नाव घ्या; गळा दाबून नाही”
“पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा”
“ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणा म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं”