बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण!

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

उद्या बहिणीचं लग्न, आज भावाचा दुर्दैवी मृत्यू; इचलकरंजीतील हृदयद्रावक घटना

लस घ्याच! लसीकरणानंतर मृत्यूचं प्रमाण केवळ 0.00005 टक्के

‘…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या टीकेला आदित्य ठाकरे यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More