Top News महाराष्ट्र मुंबई

‘लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नाही’; पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये

मुंबई | भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह महाबळेश्वरला छोटी टूर केली. सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. या टूरमध्ये त्यांची गाडी काही लोकांनी अडवून फोटोसाठी आग्रह केला. पंकजांनी हाच किस्सा शेअर केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नसतो. पण मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो. दोन दिवस हवा बदल म्हणून मी पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते. परत येताना रस्त्यात नेहमी प्रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली ड्रायव्हर लोंढे होते.

त्यांनी अगदी भावुक होऊन माझ्या कार्यक्रमाची इतमभूत माहिती ते कशी ठेवतात हे सांगितले अगदी माझ्या पोस्ट किती ते आपुलकीने लाईक करतात हेही सांगितलं असल्याचं पंकजाताईंनी सांगितलं.

दरम्यान, तितक्यात गाडीतील विद्यार्थी उतरले बाजूच्या बस मधील प्रवासी उतरले त्यांनी ही फोटो काढले. गाडीत बसलेला पंकजाताईंचा मुलगा कौतुकाने हे बघत असल्याचं पंकजा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”

‘फडणवीस आणि पाटलांनी पक्ष प्रवेशासाठी 100 कोटींची ऑफर दिली होती’; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट

“राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती”

प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेब आजही जिवंत आहेत- उर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या