मुंबई | राज्यासह देशात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करण्याचा सपाटा चालवला आहे. अशात राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर आता एनआयएनं राज्यात मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे.
कारवाईनंतर राज्यातील वातावरण तापलेलं आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी एनआयएच्या कारवाईवरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. नवाब मलिक यांच्या चौकशीतूनच एनआयएनं कारवाई केली आहे, असं लाड म्हणाले आहेत.
एनआयएच्या कारवाईतून भविष्यात मुंबईत होणारे घातपात आणि पुर्वी झालेले घातपात यातील मोठ्या नेत्याचं सहभाग लवकरच उघड होतील, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत. परिणामी राज्यात वाद वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत भेंडीबाजार भागात एनआयएनं मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली आहे. त्यानंतर आता भाजपनं महाविकास आघाडीवर टीका करायला सुरूवात केली आहे.
थोडक्यात बातम्या –
संदीप देशपांडेंच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव
दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर
श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी! महिंदा राजपक्षेंचा राजीनामा
सत्र न्यायलयाचा राणा दांपत्याला दणका; अटींचं उल्लंघन अंगलट येणार?
संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
Comments are closed.