बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यामुळे शिवसेना गांधी घराण्याभोवती पिंगा घालतीये”

सोलापूर | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांची भेट घेतली होती. यावरून सध्या विरोधकांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेला धारेवर धरलं आहे. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे किंवा हिंदुत्त्व नाही तर गांधी परिवार आता शिवसेनेचा केंद्रबिंदू असल्याचा टोला दरेकरांनी लगावला आहे.

प्रविण दरेकर हे सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शिवसेनेचा केंद्रबिंदू हा हिंदूत्व आणि बाळासाहेब ठाकरे होता. मात्र आता शिवसेनेचा केंद्रबिंदू हे गांधी घराणं झालं आहे. त्यामुळे शिवसेना आता गांधी घराण्याभोवती पिंगा घालत आहे, असा घणाघात दरेकरांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, शिवसेना याअगोदर काँग्रेससोबत गेली आहे. आता ती यूपीएत गेली तर मोठा फरक पडणार नाही. सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेनं हिंदूत्व आणि मराठी माणसाला तिलांजली दिली आहे. मात्र हे सरकार दिर्घकाळ टिकणार नाही, अशी टीका दरेकरांनी केली आहे.

दरम्यान, प्रविण दरेकरांनी यावेळी गिरीश कुबेरांवर झालेल्या शाई हल्ल्याबद्दलही मत व्यक्त केलं आहे.  ते म्हणाले, जर अशा लोकांमुळे समाजाच्या भावना बिघडल्या तर अॅक्शनला रिअॅक्शन मिळतेच. विचारवंत, लेखक आणि पत्रकार यांच्या लेखणीने समाजाला दिशा मिळत असते. त्यामुळे त्यांनी लोकभावनेचा आदर केला पाहीजे, असं त्यांनी सुनावलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…तर Omicron मुळे देशात तिसरी लाट येईल’, IMAचा इशारा

दिलासादायक! Omicron वर औषध सापडलं, शास्त्रज्ञांचा दावा

डेल्टापेक्षा omicron किती घातक?; ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, खुर्ची टिकवण्यासाठी…”

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, ‘इतक्या’ हजार कोटी जणांना मिळणार नोकऱ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More