Top News महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”

मुंबई | महाराष्ट्रात शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिला होता. यावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वाने सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली असल्याचंही विखे पाटील म्हणाले.

दरम्यान,  केंद्रावर टीका करणं म्हणजे आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जर तुमच्यात राज्य चालवण्याची धमक असेल ना तर मग केंद्राकडे बोट का दाखवता, असा सवालही पाटलांनी राज्य सरकारला केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा….’; जान कुमार सानूच्या समर्थनात धावली ‘ही’ अभिनेत्री

दिवाळीनंतर शाळा, कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचा 31 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रह

हम तो डुबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे! अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर मात

“महविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या