मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे हातात दिवे घेऊन उभं राहण्याचं आवाहन केलं होतं. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोदींवर टीके केली. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी नितीन राऊत यांना सवाल करत महाविकास आघाडीवरही टीका केली आहे.
नितीन राऊत यांनी सेंट्रल पॉवर ग्रिडच्या अधिकाऱ्यांशी किंवा अन्य तज्ञांशी चर्चा न करता केवळ अभ्यासपूर्ण व्हाट्सअॅपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो ? का बंद करून झोपतो?, राऊत केलेल्या या टीकेवरून तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो, असं म्हणत कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा देऊ नका. मी लोकांना आवाहन करतो की दिवे आणि मेणबत्त्या लावा मात्र लाईट्स बंद करु नका, असंही नितीन राऊत यांनी म्हटलं होतं.
मा @NitinRaut_INC यांनी सेंट्रल पॉवर ग्रिड च्या अधिकाऱ्यांशी अन्यथा .अन्य तज्ञांशी चर्चा न करता केवळ अअभ्यासपूर्ण व्हाट्सएपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केले आहे .देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो ? का बंद करून झोपतो?यावरच तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो https://t.co/ZdRzSqIiX7
— Ram Kadam (@ramkadam) April 3, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
केंद्र शासनाकडून मदतीचा हात; महिलांच्या खात्यात 500 तर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा
डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा- अमित शहा
महत्वाच्या बातम्या-
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना भाजपचे 3 प्रश्न!
या तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; तिकीट बुकिंग करण्यास एअर इंडियाचा नकार
एकाचवेळी देशातील सर्व लाईट्स बंद केल्या तर आहे ‘हा’ धोका!
Comments are closed.