बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

मुंबई | आर्यन खान प्रकरणाला रोज वेगळं वळण लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच पंच प्रभाकर साईलने एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तर त्यातील 8 कोटी रूपये हे समीर वानखेडेंना जाणार असल्याचा खळबळजनक आरोप साईलने केला होता.

या आरोपामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट आला असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी स्टिंग ऑपरेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत समीर वानखेडेंवर असलेला लाच घेतल्याचा आरोप खोटा असून किरण गोसावी यांच्याकडून पैसे घेण्यासाठी साईलने हा आरोप केला असल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. नोटरी रामजी गुप्ता या व्यक्तीचं स्टिंग ऑपरेशन केलं असल्याचं कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या व्हिडीओनुसार प्रभाकर साईलने किरण गोसावीकडे पैसे मागितले होते. पण किरण गोसावीने पैसे देण्यास नकार दिला आणि त्यामुळेच प्रभाकर साईल हे आरोप करत असल्याचं रामजी गुप्ता यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे. मोहित कंबोज यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत किती तथ्य आहे हे अजून समोर आलं नसलं तरी प्रश्नांची सुई आता पंच प्रभाकर साईलकडे वळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत या सगळ्या प्रकारामागे मियाँ नवाब आणि मनोज यांचा हात असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यात नवाब मलिकही गौप्यस्फोट करणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला काय वळण लागणार आणि सत्य समोर येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

मराठी सिनेमाचा सोनेरी काळ पाहिलेल्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’चा पडदा कायमचा बंद होणार?

गावावरुन आलं, बुधवार पेठेत गेलं अन् भलतंच घडलं…

मराठी सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस, पाहा त्याचे आठवणीतील फोटोज्

‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र’, नवाब मलिकांच्या ट्विटनं पुन्हा खळबळ

11 महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आंदोलन मात्र सुरूच; पण आता पुढे काय?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More