भाजप नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; राजकारण पेटलं

BJP Leader | मुस्लिमांबाबत भाजप नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे दिल्लीचं राजकारण पेटलं आहे. भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांना मुस्लिमांबाबत वाद पेटणारं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “आपल्याला रणनितीमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. सबका साथ, सबका विकास ऐवजी सबका साथ जो मत देणार त्याचच काम करणार असं बोललं पाहिजे”, असं शुभेंदु म्हणाले आहेत. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (BJP Leader)

शुभेंदु यांनी केलेल्या वक्तव्यावरून वरिष्ठ नेतृत्वाने आपण त्या मताशी सहमत नसल्याचं मत स्पष्ट केलं आहे. 2014 साली मोदी सरकारने सबका साथ सबका विकास अशी घोषणा केली होती. त्यामुळे या घोषणेमुळे केंद्रातील मोदी सरकारला याचा मतांमध्ये फायदा झालाय. (BJP Leader)

कोण आहे शुभेंदु अधिकारी?

शुभेंदु अधिकारी हे बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. कोलकाता येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. “आपल्याला भाजपांतर्गत अल्पसंख्यांक मोर्चा त्यांनी बंद केला पाहिजे. जे लोकं भाजपला मत देत नाहीत, त्यासाठी काम का करायचं? भाजपचा अर्थ म्हणजे हिंदूंचा पक्ष आहे,” असं शुभेंदु म्हणाले. (BJP Leader)

नेमकं काय म्हणाले शुभेंदु?

‘मी ‘सबका साथ, सबका विकास’ बोलणार नाही. या देशात राष्ट्रवादी मुस्लिम प्रकारच नाहीय. हे सर्व बकवास आहे’, असं शुभेंदु म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झाल्यानंतर शुभेंदु अधिकारी यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास सोबत असल्याचं त्यांनी म्हटलं.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी शुभेंदु अधिकारी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी देखील यावर भाष्य केलं आहे की,  भाजपा जर ‘सबका साथ, सबका विकास’ घोषणेसोबत आहे, तर त्यांनी शुभेंदुवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

News Title – BJP Leader Shubhendu Adhikari Statement Against Muslim Regional

महत्त्वाच्या बातम्या

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका अधिक, पालकांनो आपल्या मुलांचं ‘असं’ करा संरक्षण!

शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना भाजपचा ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहायचाय!

पुढील 5 दिवस ‘या’ भागात जोरदार पाऊस बरसणार; ऑरेंज अलर्ट जारी

अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?, शरद पवार म्हणाले…

निलेश लंकेंचं टेंशन वाढणार?, सुजय विखेंची ‘ती’ मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य