बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

मुंबई | भाजप नेत्या आणि प्रसिद्ध टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारासह भाजपमध्ये आणि त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये शोकाकूल वातावरण आहे.

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह होत्या. त्या विविध फोटो आणि व्हिजीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत होत्या. काल संध्याकाळी त्यांनी एक व्हीडिओ पोस्ट केला होता.

बिग बॉसच्या 14 व्या पर्वातही त्यांनी हजेरी लावली होती. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आदमपूर मतदार संघातून त्यांनी हरियाणातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More