#MeToo | पत्रकार इतक्याही काही निरागस नसतात; भाजपच्या महिला नेत्याचं वक्तव्य!

भोपाळ |  परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर महिला पत्रकारांनी केलेल्या छळाच्या आरोपांबाबत विचारलं असता, मध्य प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्ष लता एलकर  म्हणाल्या, पत्रकार इतक्याही काही निरागस नसतात की कुणी त्यांचा गैरफायदा घ्यावा.

एम. जे. अकबर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. असे आरोप काँग्रेसच्या नेत्यावर झाले असते, तर राजीनाम्याची मागणी केली असती. पण भाजपचेच नेते असल्याने राजीनामा मागणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, #MeToo मोहिमेतून स्त्रिया पुढे येत अन्यायाविरोधात बोलू लागल्या आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी मान्य केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मनसेच्या इंजिनात पुन्हा इमकमिंग सुरू; शिवसेना,राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

-…असं छापलं जात असताना राज्याचं शिक्षण खातं झोपा काढत होतं का?

-…तेव्हा मी असं लिहायला नको होतं; संभाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी शुभा साठेंनी मागितली माफी!

-फक्त 40 टक्के नव्हे, अख्खं सरकारच बिनकामचं; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-‘SHIVDE I AM SORRY’ नंतर पिंपरीत ‘स्मार्ट बायका कुठे जातात? पोस्टरबाजीने खळबळ