नवी दिल्ली | भाजप नेते आली. जी एस बावा यांनी घराजवळील पार्कमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पार्कमध्ये संध्याकाळी वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
आली. जी. एस बावा भाजपचे पश्चिम दिल्लीचे माजी उपाध्यक्ष होते. 58 वर्षीय जी एस बावा हे पश्चिम दिल्लीमधील फतेह नगर येथे वास्तव्यास होते. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. जी एस बावा यांचा मृतदेह सुभाष नगरमधील पार्कमध्ये असणाऱ्या तळ्याच्या शेजारी लटकलेल्या अवस्थेत आढळला. आली. जी एस बावा यांनी कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पोलीस किंवा पक्षाने आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप सांगितलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिल्ली-एनसीआरमध्ये आत्महत्यांशी संबंधित घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी नोएडामध्ये चार जणांनी वेगळ्या घटनांमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यातील दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
थोडक्यात बातम्या-
“नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”
पार्थ पवारांनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या
“मोदी बांगलादेशात जाऊन आले पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला”
शरद पवारांच्या तब्येतीची मोदींनाही काळजी; फोन करत केली विचारपूस
नांदेडमध्ये तलवारी उगारत शीख समुदायाची मिरवणूक, पोलिसांवर केला हल्ला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.