“शिवसेनेनं बेईमानी केली नसती तर…”; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई | 2019 च्या विधानसभा निकालानंतर राज्यात ऐतिसासिक राजकीय घडामोड घडली होती. पक्के दोस्त असणारे शिवसेना आणि भाजप आता एकमेकांचे कट्टर शत्रु झाले आहेत. महाविकास आघाडीची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते जोरदार टीका करत आहेत. अशात भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊतांना मी धन्यवाद देईन की मागच्या 24 ऑक्टोबर 2019 ला सोबत आले असते तर त्यांनी बेईमानी केली नसती. त्यामुळं पुन्हा आम्हाला 2024 मध्ये युतीचं सरकार आणावं लागलं असतं, असं मुनगंटीवर म्हणाले आहेत. पण आमची उन्नती व्हावी, भाजपच एकट्याचं सरकार यावं, या विचारानं त्यांनी बेईमानी केली. आता या बेईमानीचं उत्तर जनता देईल, असं मुनगंटीवर म्हणाले आहेत.
शिवसेनेनं आमच्याशी बेईमानी केली त्यातून आम्हाला निश्चित ऊर्जा, उत्साह प्राप्त होऊन 2024 मध्ये आमचं सरकार येईल यात शंका नाही, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. शिवसेनेवर सातत्यानं होत असलेल्या आरोपांमुळं राज्यात भाजप-शिवसेना वाद एक दिवसही कमी झालेला पाहायला मिळाला नाही. आता मुनगंटीवरांच्या आरोपानंतर शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची असणार आहे.
दरम्यान, तीन पक्षाच्या हातात सत्ता असल्यामुळं राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. महाराष्ट्राचे तीन तेरा वाजवणारे तीन पक्ष सत्तेत बसल्यानं राज्यात काम होत नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या –
“आमच्याशी पंगा घेऊ नका, खूप महागात पडेल”; राऊत विरोधकांवर बरसले
“मौका सभी को मिलता है”; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा
आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या लेकींची कमाल; अंशू आणि राधिकानं रौप्यपदक पटकावलं
पालकांनो सावधान! लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला
“बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर…”; शरद पवारांनी कान टोचले
Comments are closed.