औरंगाबाद महाराष्ट्र

यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

औरंगाबाद | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलश रथावर भाजपच्या एका नेत्याने फोटो सेशन केले आहे. सेल्फी काढणारे औरंगाबादचे उपमहापौर विजय औताडे आहेत. त्यांचा सेल्फी काढतानाचा फोटो व्हायरल होत आहे. 

व्हायरल फोटोमध्ये औतडे सेल्फी काढताना दिसत आहेत. अटलजींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केला म्हणून एमआयएमचे नगरसेवक मतीन यांना मारहाण करण्यात आली होती. त्यात औताडे आघाडीवर होते.

दरम्यान, आता सेल्फी काढून औताडे स्वतः अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आता भाजप औतडेंवर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

-पप्पू नापास हो गया; मनसेकडून भाजपच्या या नेत्याचं ‘पप्पू’ नामकरण!

-वडापावमध्ये पालीचं मेेलेलं पिल्लू; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या