Top News महाराष्ट्र मुंबई

“पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या “दिशेला” जाताना जीन्स घालावी सरकारी कामकाजात नव्हे”

मुंबई | शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेशभूषा ही अशोभनीय, अस्वच्छ असल्याने त्याचा अपिरत्यक्षपणे परिणाम हा कामावर होतो त्यामुळे जनमानसातील प्रतिमाही मलिन होते, असा निष्कर्ष काढत महाराष्ट्र सरकारने  शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ड्रेसकोड अनिवार्य केला आहे.

राज्य सरकारच्या याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत त्यामध्ये आदित्य ठाकरेंना टॅग केलं आहे.

अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पोशाखाबाबत राज्य शासनाने नुकताच घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. मात्र शासकीय यंत्रणांचे प्रमुख असलेल्या मंत्र्यांना सुद्धा हा निर्णय बंधनकारक असावा. पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या “दिशेला” जाताना जीन्स घालावी सरकारी कामकाजात नव्हे, असं तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुषार भोसलेंनी खाजगी पर्यटनाच्या दिशेला जाताना म्हणत दिशेला या शब्दाला अधोरेखित केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“कुणाला माहिती आहे, नव्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ‘टाटा’ची कशी निवड झाली?”

“कंगणाने केलेल्या खोट्या ट्विटमुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली”

कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पदड्याआड- अजित पवार

धक्कादायक! समुद्रकिनारी प्राचीन वस्तु म्हणून आणली घरी पण घडलं विचित्र

ईडीने खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी केली- प्रताप सरनाईक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या