Top News

कोरोनाला घाबरू नका, आज नाहीतर उद्या प्रत्येकाला जायचंच आहे – उदयनराजे भोसले

सातारा | कोरोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकणार नाही. आज ना उद्या प्रत्येकाला जायचं आहे. कोरोनाला घाबरू नका, भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सातारा जिल्हा बँकेत जाऊन बँकेचे अध्यक्ष आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण आपल्याकडे कोरोनाचा बाऊ केला जात आहे. कोरोना हा व्हायरस आहे. इतर आजारातूनदेखील लोकांचा मृत्यू होतो. लोकांना घाबरवू नका. लोकांना वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

बंदमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्या चोरमाऱ्या वाढणार आहेत. लोक काम करायला इच्छुक आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी आणि काम करावे. यावर नक्की लस निघेल असं सांगता येत नाही, असंही उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

‘देव कुठे असेल तर तुमच्या रुपाने तो सगळ्यांना दिसतोय’, ‘डॉक्टर्स डे’निमित्त राजेश टोपेंचं डॉक्टरांना पत्र

‘लालबागचा राजा’चा ऐतिहासिक निर्णय’; यंदा गणेशोत्सव नव्हे तर….

काय बोलावं आता… संत निवृत्तीनाथ पालखीचं एसटीने ‘इतक्या’ हजारांचं फाडलं तिकीट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या