Top News

भाजप मंत्र्याने मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

भोपाळ | सध्या सोशल मीडियावर व्हायरल एक व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक मंत्री मतांसाठी एका काँग्रेस कार्यकर्त्यासमोर विनवणी करताना दिसत आहे.

ग्वालिअरमध्ये काँग्रेस पार्टी बदलून भाजपमध्ये गेलेल्या प्रद्र्युम्न सिंह तोमर हे या व्हीडिओमध्ये दिसत आहे. ते आपल्या जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यासमोर मतांसाठी विनवणी करत आहे. त्यांनी गुडघे टेकून त्याच्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं व्हीडिओमध्ये दिसत आहे.

काँग्रेस नेते अरुण यादव यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. पाहा कसं एका लाचार मंत्र्यांने काँग्रेसच्या टिकाऊ कार्यकर्त्यासमोर गुडघे टेकले, असं अरूण यादव म्हणालेत.

दरम्यान, काँग्रेसचे काही नेते बिकाऊ असू शकतात, मात्र काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता टिकाऊ आहे, असं अरुण यादव यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

प्रत्येकाला मोफत लस मिळावी, सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे- अरविंद केजरीवाल

“विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करावं”

दुपारी झोपण्यावरून चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला, ‘या’ सरकारी रुग्णालयात घेत आहेत कोरोनावरील उपचार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या