मुंबई | शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्या सत्तानाट्यात आता भाजपने उडी घेतली आहे. यावर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार राज्यपालांनी 30 जूनला विशेष अधिवेशन बोलावलं आहे.
आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भुमिकेत आहोत. आमचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील तेच सांगितले आहे. मात्र एवढे नक्की की, येत्या आषाढी एकादशीला पुजा करण्याता मान हा नव्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मिळेल. मुख्यमंत्र्यांना आता राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आघाडीला स्पष्ट बहुमत दिले होते. फडणवीस हेच मुख्यमंत्री होणे अपेक्षीत होते. पण, उद्धव ठाकरे यांनी जनमताचा अनादर करत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अनैतिक आघाडी केली. त्याची मोठी किंमत त्यांना आज मोजावी लागत आहे. ही अनैतिक आघाडी न पटल्याने काही स्वाभिमानी लोकांचा गट बंड करुन उठला आहे. त्यांचा सुद्धा हीच ईच्छा आहे की, फडणवीस मुख्यमंत्री व्हावे.
महाविकास आघाडी सरकार आषाढी एकादशीपर्यंत टिकेल का अशी सर्वांनाच उत्सुक्ता लागली आहे. तसेच विठूराया आता कोणाला आपल्या पुजेसाठी बोलावतो याची अख्खा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहात आहे.
थोडक्यात बातम्या –
“संजय राऊत कालही महत्वाचे नव्हते आजही नाहीत, आता…”
“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”
भाजपबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा, म्हणाले…
ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, 30 तारखेला सरकारची बहुमत चाचणी
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाराष्ट्रात सत्तापालट होणार?
Comments are closed.