देश

“पंतप्रधान मोदींविरोधात घोषणा द्याल तर जिवंत गाडू”

लखनऊ | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू, असं वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील मंत्री रघुराज सिंग यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

देशात मोदी आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी राज आहे. त्यामुळे घोषणा देण्याआधी विचार करा. तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. तुम्हाला जामीनही मिळणार नाही. स्वत:चं भविष्य खराब करुन घेऊ नका, असा इशाराही सिंह यांनी दिला आहे.

रघुराज यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे. मोदी-योगी विरोधातल्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं ते म्हणाले आहेत.

मोदी आणि योगीच देश आणि उत्तर प्रदेशचा कारभार पाहतील आणि जसं सध्या सुरु आहे तसंच पुढेही सुरु असेल. मुठभर लोकांच्या घोषणा देण्यानं काहीही होणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

भाजपवाल्यांनो, जनाची नाही मनाची तरी बाळगा; अभिनेता हेमंत ढोमेला संताप अनावर

रायगडावर येऊन नाक घासून माफी मागावी; धनंजय मुंडे ‘त्या’ पुस्तकावरुन आक्रमक

“राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या