Top News

विखे पाटलांमुळेचं आम्ही पराभूत; भाजपचा हा नेता आक्रमक

अहमदनगर |  राधाकृष्ण विखे पाटलांमुळेचं आपला पराभव झाला, असा आरोप माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदेंसह नगर जिल्ह्यातील भाजपच्या तीन पराभूत उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या पराभूत उमदेवारांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

राम शिंदे, शिवाजी कर्डीले आणि स्नेहलता कोल्हे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आमच्या पराभवासाठी  राधाकृष्ण विखे पाटील हे जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, असं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.

जिल्ह्यात आपलं एकमुखी नेतृत्व सिद्ध व्हावं यासाठी त्यांनी पाडापाडीचं राजकारण केल्याचा दावा शिवाजी कर्डीले यांनी केला आहे. त्यामुळे पराभूत उमेदवारांनी विखेंविरोधात मोर्चा काढल्याचं दिसतंय.

दरम्यान, नगर जिल्ह्यात विखेंनी विधानसभा निवडणुकीत 12 जागा जिंकून देण्याचा दावा केला होता. मात्र, मागच्यावेळी पेक्षाही कमी जागा भाजपला मिळाल्या. 2014 मध्ये जिल्ह्यात भाजपला 5 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, 2019 विधानसभा निवडणुकीत केवळ 3 जागा जिंकता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या