Top News राजकारण

महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोनाचं राजकारण करतायत; संजय राऊत यांची टीका

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोनाचं राजकारण करत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

संजय राऊत सामनाच्या रोखठोक सदरात लिहितात, “दिल्लीत थंडी आणि प्रदूषण वाढतंय. शिवाय कोरोनाचा प्रादूर्भाव देखील वाढत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनातून बाहेर पडलेत. काँग्रेसचे नेते अहमद पटेल गेल्या 2 महिन्यांपासून कोरोनाशी झुंजत आहेत.”

ते पुढे लिहितात, राजधानीत कोरोना वाढतोय. मात्र महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोनाचं राजकारण करतायत. त्यांनी दिल्लीत येऊन परिस्थितीचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे.”

“दिल्लीत थंडी आणि प्रदूषण वाढत आहे. प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याने अनेक आजार भुताटकीसारखे नाचताना दिसत आहेत. ही भुताटकी जीवघेणी आहे. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे, पण ही तिसरी लाट आहे असे जाणकार सांगतात,” असंही त्यांनी नमूद केलंय.

महत्वाच्या बातम्या-

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्वप्नातच ठरवावा; अनिल परब यांचा आशिष शेलारांना टोला

18 तासांच्या चौकशीनंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचियाला देखील अटक

पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चंद्रयान नव्हे; मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या