कोल्हापूर | सरकार जी मदत करत आहे ते काय उपकार करत नाही. जी काय मदत देताय ती काय बापाच्या घरातून देताय का?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातबाजीवर संताप व्यक्त केला आहे.
या पाकिटांवर फोटो लावले आहेत आता त्या अन्नाच्या पाकिटांवर कमळ लावायचं बाकी राहिलंय. पूरग्रस्तांना मदत करायची असेल तर स्वत:च्या खिशातली द्या आणि त्यावर तुमचे फोटो चिटकवा, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली राजू शेेट्टींनी दिली आहे.
दरम्यान, गिरीश महाजनांचा सेल्फी व्हिडीओ असो किंवा स्टिकर चिटकवणे असो, यावरुन भाजपच्या नेत्यांची असंवेदनशीलता दिसून येते. भाजप केवळ राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला.
महत्वाच्या बातम्या-
-अखेर राज्य सरकारनं तो वादग्रस्त निर्णय बदलला; आता पूरग्रस्तांना मिळणार रोख मदत!
-#सेल्फिशसरकार | शोबाजीपायी लोकांना उपाशी माराल- धनंजय मुंडे
-धक्कादायक!!! दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर मुख्यमंत्री आणि आमदाराचं ब्रँडिंग
-आता अंत्ययात्राही थांबून काढा, कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत- जितेंद्र आव्हाड
-…तर त्याला शासनच जबाबदार आहे- धैर्यशील माने
Comments are closed.