मुंबई | बिहारच्या विकासाठी भाजप नत्यांनी एकत्र काम करावं, त्यामुळे महाराष्ट्रात शांतता नांदेल, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षनेत्याला बिहारमधील विजयाच श्रेय दिलं जातं, याचा आम्हाला आनंद आहे. याचा आनंद भाजपने चार वर्षे साजरा करत बसावं, असं शिवसेनेने म्हटले आहे.
इतकंच नाही तर यावेळी सामना अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावरही शिवसेनेनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधून-मधून काही पुड्या सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महारष्टाचे राज्यपालही याच मताचे असल्याचे शिवसनेच्या अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
वीजबिल माफीवरुन नितीन राऊतांकडून फसवणूक, विधानसभेत हक्कभंग आणणार- बबनराव लोणीकर
“अख्खा दिवस गेला पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट किंवा मसेजही दिसला नाही”
योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत
“इतकंच म्हणेन सदाभाऊ… तुम्ही गेल्या घरी सुखी राहा”