आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर?, भाजप नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजप (Bjp) खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

स्वप्न पाहून शिवसेना (Shivsena) संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही. त्याप्रमाणे भविष्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक असेल, असं ते म्हणालेत. रणजीतसिंह निंबाळकर मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मग मुख्यमंत्री काय आणि मंत्री काय. पक्ष शिल्लक ठेवणे ही त्यांची सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये हुरूप राहावा म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत आणि बॅनरबाजी करत आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, दरम्यान, मागील महिन्याभरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लागल्याचं समोर आलं. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या बॅनरवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या-