मुंबई | सार्वजनिक बँकांना डुबवण्यात भाजपाचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
भाजप सरकारच्या पाठबळामुळेच बँकांना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा सर्व थकबाकीदारांवर कठोर कारवाई करुन जनतेचा पैसा पुन्हा परत आला पाहिजे, अशी मागणीही यावेळी सचिन सावंत यांनी केली.
सार्वजनिक बँकांना डुबवण्यात भाजपाचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आहे. भाजप सरकारच्या पाठबळामुळेच बँकांना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा सर्व थकबाकीदारांवर कठोर कारवाई करुन जनतेचा पैसा पुन्हा परत आला पाहिजे. pic.twitter.com/vAJLKNDweJ
— Sachin Sawant (@sachin_inc) June 5, 2019
नीरव मोदींची संख्या आता भारतीय जनता पक्षात वाढत चालली आहे. याचं उत्तर आता भारतीय जनता पक्षानेच दिलं पाहीजे, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘विलफुल डिफोल्ट लिस्ट’ मध्ये याआधी पूनम महाजन यांचं नाव आलं होतं आणि आता मोहित कुंबोज यांचंही नाव आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी; कारभार पारदर्शी नसल्याचा लोकयुक्तांचा ठपका
-नव्याचे नऊ दिवस असतात; अजित पवारांचा रणजितसिंह निंबाळकरांना टोला
-छत्रपतींच्या जयघोषाने रायगड दुमदुमला; महाराष्ट्रभर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
-खासदार उदयनराजे भोसले राज्याभिषेकादिनी महाराजांच्या चरणी नतमस्तक
-गडकरींबाबत अपशब्द वापरणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पक्षाकडून मिळाली ‘ही’ शिक्षा!
Comments are closed.