बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘साडी नाही तर बरमुडा घाला’; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

कोलकता | सध्या देशात 5 राज्यांत विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुका सर्वात चर्चेच्या विषय ठरत आहेेत. भाजप आणि तृणमुल काँग्रेस या निवडणुकीत संपुर्ण ताकदीनिशी उतरली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या प्रचार सभेतून भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. तर भाजपकडून प्रचारात उतरलेले नेते ममतांवर टीका करताना दिसत आहे. आता पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममतांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.

ममतांच्या पायाचं प्लास्टर कापलं आहे. तर त्यांच्या पायाला कॅप बॅडेज बांधलेलं आहे. ममता सर्वांना पाय वर करून दाखवत आहेत. त्यांनी साडी घातली तरी त्यांचा एक पाय उघडा तर एक पाय झाकलेला असतो. अशा प्रकारची साडी घातलेली कधीच पाहिली नाही. हवं तर बर्मुडा घालावा, असं वक्तव्य दिलीप घोष यांनी केलं आहे.

एका प्रचार सभेत बोलताना घोष यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यावर तृणमुलचे कार्यकर्ते भाजपवर चांगलेच भडकले आहेत. काही दिवसांपुर्वी ममता बॅनर्जी यांच्या पायाला जबर मार लागला होता. त्यामुळे ममता 2 दिवस रूग्णालयात भरती होत्या. बाहेर आल्यानंतर देखील ममता व्हिलचेअरवरून पुन्हा जोरदार प्रचाराला लागल्या आहेत. तर ममतांच्या दुखापतीमुळे लोकांची सहानभुती देखी तृणमुलला मिळत आहे.

दरम्यान, ममतांना झालेल्या दुखापतीत भाजप जबाबदार असल्याचं जर ममतांना वाटत असेल तर, त्यांनी त्यांचा रिपोर्ट सार्वजनिक करावा, असा टोला अमित शहा यांनी लगावला आहे. तर पहिल्या टप्यातील मतदान काही दिवसांवर आलं असल्याने या रणधुमाळीची उत्सुकता लोकांमध्ये आणखीच वाढलेली दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…म्हणून तर आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली नाही ना?’; भाजप नेत्याचा सवाल

“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”

देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला- नाना पटोले

कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या 10 शहरांपैकी 9 शहरं महाराष्ट्रातली, केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये!

“एका व्यक्तीनं जरी त्रास दिल्याचं दाखवून दिलं तर उमेदवारी अर्ज भरणार नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More