बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धुळ्यात अमरिशभाईंचाच डंका; सर्वच जागांवर भाजपने मारली बाजी

धुळे |  भाजप नेते अमरिशभाई पटेल यांचा धुळ्यात पून्हा एकदा डंका वाजला आहे. शिरपूर पंचायतीच्या सहाच्या सहा गणांत भाजपचा विजयी झेंडा रोवला गेला आहे. शिरपूर पंचायतीत दणदणीत विजय मिळवत अमरिशभाई पटेल यांनी धुळ्यात त्यांचंच वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

धुळ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं. यंदा धुळ्यात एकुण 65 टक्के मतदान झालं होतं. तर शिरपूर तालुक्यातच 57.12 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे शिरपूर पंचायत समितीच्या सहा गणांवर भाजपचं वर्चस्व कायम राहणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

पण अमरिशभाई पटेल यांच्या अचूक नियोजनामुळं शिरपूर पंचायत समितीत भाजपनं एक हाती विजय मिळवला आहे. बिनविरोध झालेल्या निवडणुका वगळल्या तर धुळ्यात 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समितीच्या गणांत. मतदान झालं होतं. धुळ्यात भाजपने बहुमत मिळवलं आहे. 56 पैकी 27 जागा भाजपकडे आहेत. राष्ट्रवादीकडे 3, काँग्रेसकडे 6 तर शिवसेनेकडे 2 जागा आहेत.

या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला असला तरी काँग्रेस मात्र कडवं आव्हान देण्याची शक्यता आहे. भाजपला जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या दोन जागाही भाजपला मिळू देणार नाही. इतकंच नाही तर ज्या अपक्षांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला होता तेही पाठिंबा काढून घेतील, असा दावा काँग्रेस प्रदेश कार्यकारणीचे कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केला होता. त्यामुळे आता जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेसाठी राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

अजब करिअरची गजब कहाणी, लग्नात करवली बनून तरुणी कमावते लाखो रुपये!

प्रियंका गांधींच्या अटकेने आव्हाडांना झाली इंदिरा गांधींची आठवण, म्हणाले…

“मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावूनच ठरणार”

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं आत्महत्या सत्र सुरूच; आता ‘ही’ घटना आली समोर

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महिलेने वाटेतच दिला बाळाला जन्म आणि दुर्देवाने व्हायला नको तेच झालं…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More