रांची | गोमांस हाताळल्याच्या संशयावरून रामगढमध्ये तरूणाची हत्या केल्या प्रकरणी 8 आरोपींना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी या आरोपींचं स्वागत केलं आहे.
सिन्हा यांनी या आरोपींचे पुष्पहार घालून आणि कार्यालयात मिठाई वाटून स्वागत केले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अलीमुद्दीन या तरूणाची जमावानं हत्या केली होती. त्यातील 11 पैकी 8 आरोपींना जामीन मिळाल्यानंतर माजी आमदार शंकर चौधरी यांनी आपला आनंद पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला. शिवाय सर्वांची सुटका झाल्यावर रामगडमध्ये भव्य मिरवणूक काढणार आहे, असंही त्यांनी जाहीर केलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-वेळ आली तर गनिमी काव्याने आंदोलन करु- राजू शेट्टी
-महादेव जानकर यांचं मंत्रिपद जाणार? काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे- शरद पवार
-शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय
-संभाजी भिडेंनी आम्हाला शब्द दिलाय; शिवसेनेचा दावा
Comments are closed.