Top News महाराष्ट्र मुंबई

भाजपला धक्का! 11 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती धरलं धनुष्य

मुंबई | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला वेळ असला तरी मात्र राजकीय समीकरणं आतापासूनच बदलू लागली आहेत. शिवसेना आपली सत्ता कायय राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच भाजपचे माजी नगरसेवक रामआशिष यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दिघा परिसरातील यादव नगरमध्ये एकहाती वर्चस्व असलेले रामआशिष यादव हे पालिकेच्या स्थापनेपासून आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.

आतापर्यंत 11 पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी पक्षांतर केलं आहे. त्यामुळे भाजपला नगरसेवकांची गळती थांबवण्याचं आव्हान असणार आहे. पक्षांतरासाठी दबाव असल्याने काही नेत्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.

दरम्यान, शनिवारी रामआशिष यादव यांनी शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

थोडक्यात बातम्या-

जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा!

लालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल

पुण्यात आगींचं सत्र सुरुच; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा डेपोला भीषण आग

माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही- अनिता बोस

लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या