बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जबाबदारीपासून पळ काढणे ही राहुल गांधी यांची जुनीच सवय”

मुंबई  | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष सहभागी आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसचे आमदार देखील सहभागी आहे. असं असून देखील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र शासनाच्या अपयशाची सामूहिक जबाबदारी स्विकारण्यास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नकार देऊन जबाबदारी पासून पळ काढण्याची घेतलेली भूमिका ही चुकीची आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी आज उद्धव ठाकरे सरकारला काँग्रेसचा फक्त पाठिंबा आहे, परंतु निर्णय प्रक्रियेत काँग्रेस पक्ष सहभागी नसल्याचे सांगितले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारला अपयश आले आहे. या अपयशाची जबाबदारी ही सत्तेतील तिन्ही पक्षाची आहे. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अपयशाच्या जबाबदारी पासून पळ काढू पाहत आहे, असं ते म्हणाले.

राहुलजींची ही सवय जुनीच आहे, जेव्हा जेव्हा अडचणींचा प्रसंग येतो ते जबाबदारी पासून पळ काढतात, अशी टीका करत त्यामुळे त्यांची आजची भूमिका चुकीची असली तरी आश्चर्यकारक नाही, असं भांडारी म्हणाले आहेत.

दुसरीकडे, मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. महाराष्ट्र सरकारविषयी मी काय बोललो हे माझ्या व्हीडिओमध्ये जाऊन नीट पाहा, असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पियूष गोयल यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले….

“ठाकरे सरकारला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही, त्यासाठी त्यांनी एखादी कंपनी उघडावी”

महत्वाच्या बातम्या-

रेल्वेचा गोंधळ… मुंबईत रात्री उशिरा CSMT आणि टिळक टर्मिनसवर झोप उडवणारी गर्दी

पुण्यात एकाच दिवशी 399 बाधित; महापौरांच्या खुलाश्याने पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

“माझं काही खरं नाही,…तर मी लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More