भाजप नेत्याची वाढदिवसादिनी निवृत्तीची घोषणा; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

BJP Leader Murder

BJP Maharashtra | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि परतूर-मंठा (Partur-Mantha) विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी विधानसभा निवडणुकीतून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, पक्षाने संधी दिली तर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. (BJP Maharashtra)

“विधानसभा निवडणुकीतून निवृत्ती घेतो”

आज बबनराव लोणीकर यांचा वाढदिवस असून, या विशेष दिवशी त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीसंदर्भात मोठी घोषणा केली. “माझं वय आता 60 वर्षे झालं आहे, त्यामुळे मी निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी निवडणुकीपासून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोणीकर हे भाजपचे महत्त्वाचे नेते असून, मराठवाड्यात त्यांचा प्रभाव मोठा आहे. ते माजी मंत्री राहिले असून, सध्या परतूर-मंठा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत.

विधानसभेपासून माघार घेत असतानाच बबनराव लोणीकर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “साधू-संतांच्या आशीर्वादाने आणि पक्षाने संधी दिली, तर एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे,” असे सांगत त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रवेश करण्याचे संकेत दिले. ही घोषणा केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

“मराठवाड्यात भाजपसाठी महत्त्वाचे नेतृत्व”

बबनराव लोणीकर हे भाजपच्या मराठवाड्यातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या प्रभावामुळे या भागात भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांची लोकसभेतील उमेदवारी पक्ष देणार का, हा मोठा प्रश्न आहे.

Title : BJP Maharashtra leader Babanrao Lonikar Declares Assembly Retirement 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .