मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने दिग्गज नेत्यांना पत्ता कापला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे आणि माजी मंत्री प्रकाश मेहता यांची उमेदवारी पक्षाने कापली आहे.
चौथ्या यादीत मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी नाकारून पक्षाने एकनाथ खडसेंना मोठा धक्का दिला आहे.
बोरीवलीतून विनोद तावडेंच्या जागी सुनिल राणे आणि घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहतांच्या जागी पराग शहांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे विनोद तावडे आणि प्रकाश मेहतांचा पत्ता कट झाला आहे.
पहिल्या यादीत नाव न आल्यानंतरही खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर विनोद तावडेंचं तिकीट कापल्यानंतर ते आज भाजप प्रदेश कार्यालयात आपली बाजू मांडणार आहेत.
विधानसभा निवडणूक २०१९ भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची यादी क्र. ४@Dev_Fadnavis@ChDadaPatil#पुन्हा_आणूया_आपले_सरकार pic.twitter.com/dHfNwWJ4j9
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 4, 2019
महत्वाच्या बातम्या-
अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणार!- https://t.co/Dr61Zj9FuK #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
धनगर आरक्षणाचे दोन चेहरे, एकाला भाजपची तर दुसऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी! https://t.co/b0V9Wmj1vM @NCPspeaks @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
भाजपची चौथी यादी जाहीर; ‘या’ नेत्यांना मिळाली संधी- https://t.co/5m9G5wgM77 @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
Comments are closed.